
BMC चे संपूर्ण लसीकरणाचे लक्ष्य; २० ते २२ हजार नागरिकांचा दुसरा डोस शिल्लक
मुंबई : मुंबई महापालिका (BMC) लसीकरणात अव्वल असून येत्या आठवड्यात लसीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य (Full vaccination target) पालिकेने ठेवले आहे. ८ एप्रिलला ते लक्ष्य गाठण्यात यश येईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे. मुंबईत फक्त २० ते २२ हजार नागरिकांचा दुसरा डोस (second vaccination dose) शिल्लक आहे. त्यातच दुसरा डोस दर दिवशी चार ते पाच हजार नागरिकांना दिला जात आहे. त्यामुळे जर दिवसाला वेग आतासारखाच राहिला, तर येत्या ८ एप्रिलपर्यंत १८ वर्षांवरील लसीकरण पूर्ण होईल, असा विश्वासही पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा: बेरोजगारीच्या झळा! राजस्थानच्या तरुणाचा भिलवाडा ते मुंबई पायी प्रवास
मुंबईत १६ जानेवारीपासून राष्ट्रीय लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. त्यानंतर या लसीकरणाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. मुंबईत १८ वर्षांवरील पहिला डोस जवळपास १११.४७ टक्के नागरिकांना देण्यात आला आहे; तर ९२ लाख ३४ हजार ९२७ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. ज्याचे प्रमाण ९९.९८ टक्के एवढे आहे. त्यामुळे फक्त २० ते २२ हजार नागरिकांचे लसीकरण शिल्लक असून ते या ८ एप्रिलपर्यंत पूर्ण होईल, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
मुंबईत प्रौढ पात्र लाभार्थ्यांची संख्या ९२.३६ लाख एवढी आहे. त्यापैकी मुंबईतील ९९.९८ टक्के नागरिकांचा सोमवारपर्यंत दुसरा डोस पूर्ण झाला आहे. त्यामुळे पालिका अधिकाऱ्यांना पुढच्या ७ दिवसांत मुंबईचे १०० टक्के लसीकरण पूर्ण होण्याची खात्री आहे. मुंबईचा १०० टक्के पहिला डोस १३ नोव्हेंबर २०२१ या दिवशी पूर्ण झाला होता.
हेही वाचा: रायगड : अनैतिक संबंधातून चुलत आत्याची हत्या; तीन तासांत आरोपी जेरबंद
पहिले आणि एकमेव शहर...
वैद्यकीय तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, मुंबई हे पहिले आणि एकमेव शहर आहे जिथे सर्वाधिक लसीकरण झाले आहे. त्यापाठोपाठ पुण्यात लसीकरणाचा वेग चांगला असून ९१.१५ एवढे टक्के लसीकरण झाले आहे. दरम्यान, राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये सरासरी ८० टक्के लसीकरण झाले आहे. दुसऱ्या डोसचे प्रमाण ७४.३४ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. राज्यात पहिला डोस ९२.०७ टक्क्यांपर्यंत झाला आहे.
सहा जिल्ह्यांत ८० टक्क्यांच्या खाली
राज्यात असे सहा जिल्हे आहेत जिथे लसीकरणाचा वेग कमी असून पहिला डोस सरासरी ८० टक्क्यांच्या खाली आहे. त्यात धुळे, अकोला, हिंगोली, नांदेड, बीड आणि नंदुरबार या जिल्ह्यांच्या समावेश आहे. धुळ्यात ८० टक्के, अकोल्यात ७९.९३ टक्के, हिंगोलीत ७९.६८ टक्के, नांदेडमध्ये ७९.०९ टक्के, बीडमध्ये ७७.४३ टक्के, नंदूरबारमध्ये ७३.५१ टक्के एवढेच लसीकरण झाले आहे; तर दुसऱ्या डोसचे प्रमाण या जिल्ह्यांमध्ये ६० ते ५० टक्क्यांमध्ये आहे.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..