महसूल कर्मचाऱ्यांच्या संपाने कामे खोळंबली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महसूल कर्मचाऱ्यांच्या संपाने कामे खोळंबली
महसूल कर्मचाऱ्यांच्या संपाने कामे खोळंबली

महसूल कर्मचाऱ्यांच्या संपाने कामे खोळंबली

sakal_logo
By

भिवंडी, ता. ७ (बातमीदार) ः भिवंडी तालुक्यातील तहसील कार्यालयातील महसूल विभागाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी आपल्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या बेमुदत संपाला चार दिवस झाले. या संपामुळे भिवंडी तहसीलदार कार्यालयात शुकशुकाट आहे. या संपामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची अनेक कामे खोळंबली आहेत. संप मिटेल या आशेने या नागरिक तहसील कार्यालयाच्या चकरा मारत आहेत.
महसूल विभागाच्या विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी संप सुरू असल्याने तहसीलदार कार्यालय, तलाठी, मंडळ अधिकारी, पुरवठा कार्यालयातील कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे कार्यालयातील सर्व कामकाज ठप्प झाली आहेत. या संपाची माहिती कल्पना नसल्याने कामानिमित्त कोनगाव, पडघा, शेलार, खारबाव, लाखीवली, कवाड, अनगाव, काल्हेर कशेळी अशा विविध ग्रामीण भागातील नागरिक तहसील कार्यालयात येत आहेत. दरम्यान सरकारचे आदेश आल्यानंतर संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती तहसीलदार अझिक पाटील यांनी दिली आहे.

महसूल कर्मचारी संपावर असल्याने काम रखडली आहेत. काम होईल या आशेने तहसीदार कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत. त्यामळे वेळ वाया जातोय; शिवाय आर्थिक भुर्दंडदेखील बसत आहे.
- नामदेव पाखडी, शेतकरी

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..