विजया वाड यांचा जीवनगौरव पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विजया वाड यांचा जीवनगौरव पुरस्कार
विजया वाड यांचा जीवनगौरव पुरस्कार

विजया वाड यांचा जीवनगौरव पुरस्कार

sakal_logo
By

ठाणे, ता. ७ (बातमीदार) : ‘आम्ही सिद्ध लेखिका’ या संस्थेच्या वतीने लेखिका विजया वाड यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. संस्थेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त बुधवारी (ता. १३) या सोहळ्याचे आयोजन केले आहे.
संस्थेचा वर्धापन दिन ऑनलाईन माध्यमातून साजरा केला जाणार आहे. यात संगीत, सांस्कृतिक, वक्तृत्व अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. गुरुवारी (ता. १४) आम्ही सिद्ध लेखिका या संस्थेच्या ठाणे शाखेच्या वतीने एम. एच. हायस्कूल येथे वर्धापनदिनाच्या प्रत्यक्ष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात महिलांकरिता पाककला स्पर्धा, कवी संमेलन, संगीत कार्यक्रम इत्यादी आयोजित करण्यात येणार असून याचे अध्यक्ष म्हणून मेधा सोमण या जबाबदारी पाहणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..