डहाणूत अतिक्रमणांवर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डहाणूत अतिक्रमणांवर कारवाई
डहाणूत अतिक्रमणांवर कारवाई

डहाणूत अतिक्रमणांवर कारवाई

sakal_logo
By

डहाणू, ता. ७ (बातमीदार) ः डहाणू आगार व चिखला येथे सरकारी जमिनीवर केलेली अतिक्रमणे हटविण्यात आली. उपजिल्हाधिकारी अशिमा मित्तल, तहसीलदार अभिजित देशमुख, मंडळ अधिकारी राजेश निमगुडकर, तलाठी संतोष कोटनाके यांच्या पथकाने जेसीबीच्या साह्याने ही धडक कारवाई केली.
कारवाईत मौजे डहाणू आगार येथे सरकारी जमिनीत झालेली नवीन अतिक्रमणे हटविण्यात आली, ही कारवाई सुरू असताना जेसीबी ठेकेदाराच्या सांगण्याने ड्रायव्हर पळून गेला; तरीदेखील खासगी जेसीबी मागवून कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे एका अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्याने सरकारी जागेवर केलेले अतिक्रमण करवाई करून जमीनदोस्त करण्यात आले. पुन्हा अतिक्रमण केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असे त्यास बजाविण्यात आल्याचे तहसीलदार अभिजित देशमुख यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..