बेकायदा आठवडी बाजारांना राजाश्रय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेकायदा आठवडी 
बाजारांना राजाश्रय?
बेकायदा आठवडी बाजारांना राजाश्रय?

बेकायदा आठवडी बाजारांना राजाश्रय?

sakal_logo
By

पनवेल, ता. ७ (प्रतिनिधी) : महापालिका हद्दीतील बेकायदा आठवडी बाजारांवर कारवाई करण्यासाठी जाणाऱ्या अतिक्रमणविरोधी पथकातील कर्मचाऱ्यांना स्थानिक लोकप्रतिनिधींच्या विरोधाचा सामना करावा लागत आहे. आठवडी बाजाराला राजकीय आश्रय मिळत असल्याने अतिक्रमणविरोधी पथकातील कर्मचारी हतबल झाले आहेत.

पनवेल पालिका हद्दीत सध्या आठवडी बाजाराच्या नावावर भरणाऱ्या बाजाराचे पेव फुटले आहे. वसाहतींमधील मोकळ्या भूखंडावर भरवण्यात येणाऱ्या या बाजाराचा परिणाम परिसरातील इतरांच्या व्यवसायावर होत आहे. त्यामुळे बेकायदा आठवडी बाजारांवर कारवाई करून ते बंद करण्यात यावे, अशी मागणी स्थानिक व्यापारी संघटनांकडून करण्यात आली. त्यानुसार पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाकडून वेळोवेळी बेकायदा बाजारांवर कारवाई करण्यात येते; मात्र कारवाईसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना स्थानिक लोकप्रतिनिधींच्या विरोधाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्यांना रिकाम्या हातानेच परत फिरावे लागत असल्याची खंत अतिक्रमणविरोधी पथकातील एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.
...
राजकीय नेत्यांकडून शिवीगाळ
आठवडी बाजारावर कारवाईसाठी जाणाऱ्या अतिक्रमणविरोधी पथकातील कर्मचाऱ्यांना राजकीय नेत्यांकडून अनेकदा शिवीगाळ करण्यात येते. प्रसंगी दमदाटी व धक्काबुक्कीही केली जात असल्याची माहिती अतिक्रमणविरोधी पथकातील कर्मचाऱ्यांनी दिली.
---
अतिक्रमणविरोधी पथकातील कर्मचाऱ्यांना राजकीय नेत्यांकडून कुठेही विरोध केला जात असेल, तर पोलिसांच्या मदतीने कारवाई केली जाऊ शकते; मात्र असा विरोध होत असल्यास तशी माहिती कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला देणे आवश्यक आहे.
- कैलास गावडे, उपायुक्त, पनवेल महापालिका.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..