ठाणे जिल्ह्यातही मराठीतच पाट्या; आस्थापनांना 'ही' नावे देता येणार नाहीत | Thane News Update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Marathi language
ठाणे जिल्ह्यातही मराठीतच पाट्या

ठाणे जिल्ह्यातही मराठीतच पाट्या; आस्थापनांना 'ही' नावे देता येणार नाहीत

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील (Thane) सर्व दुकाने व व्यापारी आस्थापनांनी आपल्या आस्थापनांच्या नावाचे फलक इतर भाषेबरोबरच मराठी भाषेमध्ये (Marathi language) देवनागरी लिपित असणे अनिवार्य आहे. तसेच मद्यविक्री व मद्यपान सेवन करणाऱ्या आस्थापनांना कोणत्याही गड-किल्ल्यांची (Fort Names) अथवा महापुरुषांची नावे देता येणार नाहीत, अशा सूचना कामगार उपायुक्त कार्यालयाने परिपत्रकाद्वारे (circular) दिल्या आहेत.

हेही वाचा: रायगड : आठवडाभरात कोरोनाचे १० पेक्षा कमी रुग्ण; कोविड केंद्रे अखेर बंद

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम अन्वये आस्थापनेच्या नावाचा देवनागरी लिपीतील मराठी भाषेचा फलक प्रदर्शित करणे बंधनकारक आहे. हा फलक प्रदर्शित करताना मराठी शब्दांचा आकार हा इतर भाषेतील अक्षरांच्या आकारापेक्षा लहान असू नये. तसेच मद्यविक्री किंवा मद्यपान सेवा देणाऱ्या आस्थापनेस महापुरुषांची किंवा गडकिल्ल्यांची नावे देता येणार नाहीत, असेही या पत्रातून म्हटले आहे.

पूर्वी या तरतुदी दहापेक्षा जास्त कामगार असलेल्या आस्थापनांसाठी लागू होत्या. मात्र, आता सरकारने १७ मार्च २०२२ ला अधिनियमात सुधारणा करत सर्व आस्थापनांनाही वरील तरतुदी लागू केल्या आहेत. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील सर्व दुकाने व आस्थापनाच्या मालकांनी आपल्या दुकानांची व आस्थापनांची नावे मराठी भाषेत देवनागरी लिपीत प्रदर्शित करावीत, असे आदेश उपायुक्त कार्यालयाने दिल्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Thanemarathi