डोंबिवलीत दिवसभर वीज गायब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डोंबिवलीत दिवसभर वीज गायब
डोंबिवलीत दिवसभर वीज गायब

डोंबिवलीत दिवसभर वीज गायब

sakal_logo
By

डोंबिवली, ता. ७ ः डोंबिवलीतील रामनगर फिडरवर केबलमध्ये बिघाड झाल्याने डोंबिवली पूर्वेतील काही भागात आज सकाळी सात वाजल्यापासूनच बत्ती गूल झाली. आधीच उष्म्याने हैराण झालेले डोंबिवलीकर वीजपुरवठा खंडित झाल्याने गर्मीने घरात उकडून निघाले. डोंबिवली पूर्वेतील रामनगर, तुकाराम नगर, म्हात्रे नगर, आयरे गाव, स्टेशन परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता.
कोरोना निर्बंध हटल्यानंतर शाळा, ऑफिस सुरू झाले आहेत. सकाळी शाळेत, ऑफिसमध्ये जाण्याची घाई त्यात वीज गेल्याने अनेकांना त्याचा फटका बसला. केबलमध्ये बिघाड झाल्याचे लक्षात येताच महावितरण कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जात दुरुस्तीचे काम हाती घेतले; मात्र दहा तास उलटूनदेखील दुरुस्ती झालेली नाही. दिवसभर वीज नसल्याने ग्राहकांनी महावितरण कार्यालयात फोन करून विचारणा करण्यास सुरुवात केली. यामुळे महावितरण कार्यालयातील फोन खणखणत होते. अर्धा ते एक तासात वीज येईल, असे आश्वासन महावितरण अधिकारी ग्राहकांना देत होते; मात्र अर्धा एक तास वाट पाहूनही लाईट येत नसल्याने ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण होते.

या परिसरातील बत्ती गुल
रामनगर, तुकारामनगर, म्हात्रे नगर, आयरे गाव, स्टेशन परिसर, टंडन रोड पथवरील ग्राहक

रामनगर फेडरवरील केबलमध्ये बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. केबल दुरुस्तीचे काम सुरू असून दुसऱ्या वाहिनीवरून वीज पुरवठा फिरवून वीज पुरवठा सुरू करण्यात येईल.
- धनराज बिक्कड, कार्यकारी अभियंता, महावितरण, डोंबिवली

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..