आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

sakal_logo
By

मनोर, ता.७ : ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या निर्णयाविरोधात पालघरमधील ओबीसी समाज आक्रमक झाल्याचे दिसत आहे. बोईसरमध्ये पालघर जिल्हा ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने पार पडलेल्या बैठकीत २९ एप्रिलला जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसी मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पालघर जिल्ह्यात ओबीसी संख्या लक्षणीय असताना जिल्ह्यात शून्य टक्के ओबीसी असल्याचा अहवाल देण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय आरक्षण पुन्हा मिळवण्यासाठी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्धार बोईसरच्या वंजारी समाज हॉलरमध्ये पार पडलेल्या ओबीसी संघर्ष समितीच्या बैठकीत करण्यात आला. मोर्चा यशस्वी करण्यासाठी गावोगावी समित्या नेमून दररोज वेगवेगळ्या ठिकाणी बैठका घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जेणेकरून ग्रामस्थांना संघटित केले जाईल. मोर्चा काढण्यासह सरकार दरबारी पाठपुरावा केला जाणार असून न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार यावेळी बैठकीत करण्यात आला. ओबीसी संघर्ष समितीच्या बैठकीत राजीव पाटील, आर. डी. संखे, डी. के. संखे, संजय पाटील, कुंदन संखे, अशोक वडे व अन्य पदाधिकाऱ्यांनी मोर्चा संदर्भात विचार व्यक्त केले. मोर्चा यशस्वी करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..