
''हाऊस ऑफ क्रिएटिव्हिटी''तर्फे आज कला प्रदर्शन
मुंबई, ता. ८ : बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि तिचे भाऊ लव व कुश यांच्या कलाविषयक उपक्रमाने अनेक कलाकारांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळाले आहे. आता त्याचे पहिले प्रदर्शन ‘लोकस ऑफ कंट्रोल’ हे वरळी येथील बीएमडब्ल्यू इन्फिनिटी कार्स येथे आयोजित करण्यात आले आहे. ९ आणि १० एप्रिलला होणाऱ्या या प्रदर्शनात खास निमंत्रितांना सहभागी होता येईल.
जुलै २०२१ मध्ये कोरोनाकाळात त्यांनी ‘हाऊस ऑफ क्रिएटिव्हिटी’ हा कला उपक्रम राबवला होता. तेव्हा हा उपक्रम ऑनलाईन पार पडला. या उपक्रमामुळे अनेक भारतीय कलाकारांना आपली प्रतिभा सादर करण्याची संधी मिळाली होती. आता कोरोना नियंत्रणात आल्याने त्यांनी प्रत्यक्ष उपक्रम राबवण्याची तयारी केली असून लोकस ऑफ कंट्रोल हे कला प्रदर्शन ऑफलाईन पार पडेल. या प्रदर्शनात ‘हाऊस ऑफ क्रिएटिव्हिटी’चे कलाकार आपली कला ही विविध माध्यमातून आपल्या समोर आणतील. यामध्ये अली अकबर मेहता, अरविंद सुंदर, दिगबिजाई खटुआ, गोविंद शह आज़ाद, कोशि ब्रह्मात्मज, केदार डीके, सारिका मेहता, शलाका पाटील, ऊर्वी सेठना, तुषार वाघेला व सिन्हा भावंड या कलाकारांचा सहभाग असेल.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..