fund
fundsakal media

शहापूर तालुक्यातील पर्यटन स्थळांना सहा कोटीचा निधी मंजूर

खर्डी : शहापूर तालुक्यातील पर्यटन स्थळांवर (Tourism Places) विविध उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारच्या (Maharashtra Government) प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत सहा कोटींचा निधी (six crore fund) मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे तालुक्यातील आसनगाव येथील माऊली किल्ला, कसारा पंचक्रोशीतील विहिगाव येथील अशोका धबधबा (Ashoka waterfall) या पर्यटन स्थळांचा विकास करण्याचा मार्ग खुला झाला आहे. शहापूर तालुक्यातील पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी मुंबई, ठाणे, नाशिक जिल्ह्यातून हजारो पर्यटक येत असतात.

 fund
पवई हत्या प्रकरणाचा छडा लागला; बापू व त्याची प्रेयसी रिनाला अटक

यात प्रामुख्याने आसनगाव येथील माऊली किल्ला व कसारा भागातील विहिगाव अशोका धबधबा या दोन स्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. मात्र, या ठिकाणी अनेक सोयी-सुविधांचा अभाव दिसून येतो. यामुळे पर्यटकांना अनेक समस्या उद्भवत असतात. मात्र मागील दोन वर्षांपासून कोव्हिड-१९ च्या प्रादुर्भावामुळे पर्यटन स्थळे सुन्न पडली आहेत. आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असून पुन्हा शहापूर तालुक्यातील पर्यटन स्थळे फुलणार आहेत.

त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली होती. यासाठी शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव ठेवला होता. यातून आसनगाव माऊली किल्ला, विहिगाव अशोका धबधबा परिसरातील सुशोभीकरण व पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून सहा कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

पर्यटन स्थळांच्या विकासामुळे पर्यटकांना सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहेत. शिवाय त्या क्षेत्रातील गावांचा विकास होण्यास मदत होईल. स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल.
- पांडुरंग बरोरा, माजी आमदार, शहापूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com