Murder crime
Murder crimesakal media

पवई हत्या प्रकरणाचा छडा लागला; बापू व त्याची प्रेयसी रिनाला अटक

घाटकोपर : पवईतील महात्मा फुलेनगरमध्ये गेल्या सोमवारी रात्री घडलेल्या प्रदीप भदरगे (वय ३३) या तरुणाच्या हत्या प्रकरणाचा (Murder case) छडा लावण्यात विक्रोळी पार्कसाईट पोलिसांना (vikroli police) यश आले आहे. प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून ही हत्या झाल्याचे तपासात पुढे आले आहे. प्रदीपची हत्या (Pradip bhadarge Murder) त्याचा मित्र श्रीकांत ऊर्फ बापू दिवेकर (वय २५) याने त्याची प्रेयसी रिना लाड (वय ३२) हिच्या मदतीने केली. रिनाचे प्रदीपसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून श्रीकांतने लोखंडी रॉड व चाकूने हल्ला (knife attack) करून त्याची हत्या केली. पोलिसांनी श्रीकांत ऊर्फ बापू व त्याची प्रेयसी रिना या (culprit arrested) दोघांना अटक केली आहे.

Murder crime
एसटी कर्मचाऱ्यांची घोर फसवणूक करणाऱ्यांना कठोर शिक्षा करा

न्यायालयाने या दोघांची १२ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. या घटनेतील अटक आरोपी श्रीकांत ऊर्फ बापू व मृत प्रदीप भदरगे हे दोघेही पवई आयआयटी मार्केटलगतच्या महात्मा फुलेनगरमध्ये एकाच चाळीत राहण्यास होते. त्यामुळे दोघांची मैत्री होती. आपल्या पतीपासून विभक्त झालेली रिना लाड ही महिलादेखील त्याच परिसरात एकटीच भाड्याच्या खोलीत राहत होती. त्यामुळे प्रदीप आणि श्रीकांत या दोघांची तिच्यासोबत चांगली ओळख होती. तसेच प्रदीप आणि श्रीकांत हे दोघेही रिनासोबत नियमित संपर्कात होते.
मागील काही महिन्यांपासून श्रीकांतचे रिनासोबत प्रेमसंबंध जुळले होते.

त्यामुळे रिनाचे प्रदीपसोबत संपर्कात राहणे श्रीकांतला आवडत नव्हते. रिना प्रदीपसोबत बोलल्यास तो तिला ओरडून त्याच्यासोबत संपर्क न ठेवण्याबाबत समज देत होता. रिना काही महिन्यांपूर्वी मुलुंड येथे राहण्यास गेल्यानंतरदेखील प्रदीप रिनाच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असल्याने प्रदीपचे रिनासोबत अनैतिक संबंध असल्याचा श्रीकांतला संशय होता. त्यातून हनुमान नगरच्या पायवाटेवर सोमवारी रात्री ११ च्या सुमारास श्रीकांतने प्रदीपच्या डोक्यात पाठीमागून रॉडने दोनदा हल्ले केले. तसेच त्याच्यावर चाकूने देखील वार केले. त्यामुळे उराचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com