Hawkers
HawkersSakal media

"डोंबिवली परिसर फेरिवालामुक्त करा; अन्यथा मनसे मैदानात उतरणार"

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली पालिकेत (KDMC) गेली २५ वर्षे पालिकेत शिवसेनेची (Shivsena) सत्ता आहे; परंतु त्यांना अद्याप फेरीवाल्यांचे नियोजन करता आले नाही. डोंबिवलीत पश्चिमेला वेगळी परिस्थिती तर पूर्वेला वेगळी परिस्थिती आहे. कारण त्यांच्या आर्थिक नाड्या या सत्ताधारी शिवसेना व अधिकाऱ्यांच्या हातात आहेत. फेरीवाल्यांना (Hawkers in Dombivali) शिवसेना अभय देत असल्याचे आरोप मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत (Manoj Gharat) यांनी शिवसेनेवर केला आहे. डोंबिवली पूर्व स्टेशन परिसरातील १५० मीटर परिसर फेरीवाला मुक्त करा, अन्यथा मनसे मैदानात उतरेल, असा इशारा (mns warning) देखील घरत यांनी दिला आहे.

Hawkers
मुंबई : धारावीत पालिकेच्या कामामुळे जीवितहानी होण्याची शक्यता

डोंबिवली स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत फेरीवाले बसत असून त्यांच्यामुळे या परिसराची बजबजपुरी झाली आहे. रेल्वे स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करा, १५० मीटरच्या आत फेरीवाले बसता कामा नये, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले असतानाही त्याची अंमलबजावणी काही होताना दिसत नाही.

डोंबिवली शहरात तर पश्चिमेला वेगळे चित्र व पूर्वेला वेगळे चित्र पाहायला मिळत आहे. पश्चिमेला १५० मीटरच्या आत एकाही फेरीवाल्याला बसू दिले जात नसताना हा नियम पूर्वेला का लागू नाही, असा सवाल शहराध्यक्ष घरत यांनी करत त्यांच्या आर्थिक नाड्या या सत्ताधारी शिवसेना व पालिका अधिकाऱ्यांच्या हाती असल्याचा आरोप केला. यावेळी शहर सचिव अरुण जांभळे, संदीप म्हात्रे हे उपस्थित होते.

फेरीवाल्यांना आमचा विरोध नाही; परंतु स्टेशन परिसरातील दीडशे मीटरचा परिसर हा फेरीवाला मुक्त करा ही आमची मागणी आहे. २५ वर्षे येथे शिवसेनेची सत्ता असतानासुद्धा यांना नियोजन करता येत नसेल तर केवळ हप्ते खाणे यांचे काम आहे का? पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अधिकारी हे ढिम्म असून थातूरमातूर कारवाई केवळ ते करतात, पुन्हा परिस्थिती जैसे थे असते.

- मनोज घरत, शहराध्यक्ष, मनसे, डोंबिवली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com