
बी. जी. छाया उपजिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया विभाग
अंबरनाथ, ता. १० (बातमीदार) ः अंबरनाथ येथील कै. बी. जी. छाया उपजिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया आणि शवविच्छेदन विभाग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे अंबरनाथ शहरासह तालुक्यातील नागरिकांना उल्हासनगर अथवा इतर ठिकाणी जाण्याची आवश्यकता भासणार नाही.
अंबरनाथ नगरपालिकेच्या ताब्यात असणारे कै. बी. जी. छाया रुग्णालय गेल्या काही वर्षांपूर्वी शासनाकडे हस्तांतरित करण्यात आले होते. या रुग्णालयामध्ये वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी आरोग्य विभागाकडे सतत पाठपुरावा केला होता.
एनआरएचएमच्या निधीतून नूतनीकरण केलेल्या शस्त्रक्रिया विभाग आणि शवविच्छेदन कक्षाचे शुक्रवारी (ता.८) कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या हस्ते व आरोग्य सेवा मंडळाच्या उप संचालक डॉ. गौरी राठोड, आमदार डॉ. बालाजी किणीकर, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, माजी नगराध्यक्ष विजय पवार, सुनील चौधरी, माजी नगरसेवक सुभाष साळुंके, मालती पवार, नीता परदेशी, रवींद्र पाटील आदींच्या उपस्थितीत शस्त्रक्रिया विभाग आणि शवविच्छेदन गृह विभाग सुरू करण्यात आला. रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हरीश पाटोळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. उपजिल्हा रुग्णालयात आवश्यक कर्मचारी देण्यात आला आहे. अंबरनाथसह परिसरातील नागरिकांना चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध होतील.
- डॉ. बालाजी किणीकर, आमदार.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..