ठाण्यात लोकलच्या ब्रेक सिस्टममध्ये आग
ठाणे, ता. १० : टिटवाळ्याहून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या जलद लोकलच्या ब्रेक सिस्टिममध्ये किरकोळ आग लागल्याची घटना ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक सहावर घडली. आज दुपारी या घटनेनंतर त्वरित आग विझविण्यात आली असली, तरी सुमारे पंधरा मिनिटे मध्य रेल्वेची जलद मार्गावरील वाहतूक खोळंबली होती.
ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ६ वरील टिटवाळा जलद लोकलच्या मागील मोटर कोचमधील ब्रेक सिस्टीममध्ये १२:२० वाजताच्या सुमारास किरकोळ आग लागली होती. सदरची आग ठाणे रेल्वे पोलिस कर्मचारी व रेल्वे कर्मचारी यांनी फायर एक्स्टिंग्युशरच्या साह्याने विझविली. आग पूर्णपणे विझविण्यात आल्यानंतर रेल्वे वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. या घटनेत कुणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती मध्य रेल्वे नियंत्रण कक्षाने दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.