Dr. Babasaheb Ambedkar Jayanti
Dr. Babasaheb Ambedkar Jayantisakal

बाबासाहेबांच्या जयंती निमित्त शहरात कार्यक्रमांची रेलचेल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वसई-विरार शहरात १०० हून अधिक ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन

वसई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वसई-विरार शहरात १०० हून अधिक ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरात मिरवणूकदेखील काढण्यात येणार आहे. नालासोपारा येथे आचोळे, चंदननाका, मजेठिया मार्ग, तुळिंजसह आजूबाजूच्या परिसरात जयंतीनिमित्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. विविध ठिकाणी बौद्ध पंचायत समितीच्या माध्यमातूनदेखील मानवंदना अर्पण केली जाणार आहे.

संयुक्त भीमजयंती व शिवजयंती उत्सव, परिवर्तन प्रतिष्ठानतर्फे तुळिंज येथे कव्वालीचा जंगी सामना रंगणार आहे. या वेळी गायिका सुहासिनी शिंदे, गायक संतोष घाडगे सहभाग घेणार असल्याची माहिती शिवसेना वसई तालुका सहसचिव अजित खांबे यांनी दिली; तर नालासोपारा शहरात ७० परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात येणार असून मिरवणूक काढून उत्सव साजरा केला जाणार असल्याचे माजी महापौर रूपेश जाधव यांनी सागितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com