पंतप्रधानासाठीची बुलेट प्रुफ मर्सिजीड नादुरुस्तच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi
पंतप्रधानासाठीची बुलेट प्रुफ मर्सिजीड नादुरुस्तच

पंतप्रधानासाठीची बुलेट प्रुफ मर्सिजीड नादुरुस्तच

मुंबई - भारताच्या पंतप्रधान (Prime Minister) आणि राष्ट्रपतींसाठी राखीव असलेले मर्सिडीज (Mercedes) एस क्लास बुलेटप्रूफ वाहन (Bullet Proof Vehicle) गेल्या तीन महिन्यांपासून नादुरुस्त आहे. मर्सिडीज कंपनीने ३१ लाखांचा दुरुस्तीचा खर्च सांगितला असून वाहनांचे पार्टसुद्धा सिंगापूर येथून आणावे लागणार असल्याने १७ ते २४ एप्रिलदरम्यान भारताच्या दौऱ्यावर सपत्निक येणारे मारिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ यांना भाड्याच्या वाहनांचा ताफा देण्याची वेळ राज्याच्या राजशिष्टाचार विभागावर आली आहे.

१० फेब्रुवारी रोजी देशाचे पंतप्रधान रामनाथ कोविंद मुंबई दौऱ्यावर सपत्निक आले होते. त्यांच्या दौऱ्यापूर्वी राजशिष्टाचार विभागाच्या शासकीय परिवहन सेवेच्या अधिकाऱ्यांनी वाहनांच्या ताफ्याची रंगीत तालीम घेतली होती. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरच राष्ट्रपतींसाठी आरक्षित असलेले मर्सिडीज एस क्लास बुलेटप्रूफ वाहन बंद पडले होते. त्यानंतर वेळेवर स्पेअरमध्ये बोलवण्यात आलेले नाशिक येथील पोलिस विभागाच्या मोटार ट्रान्स्पोर्टचे बुलेटप्रूफ सफारी वाहन राष्ट्रपतींना देण्यात आले होते; मात्र त्यानंतर मर्सिडीज वाहनाची तत्काळ दुरुस्ती होणे अपेक्षित असताना गेल्या तीन महिन्यांपासून अद्याप वाहनाची दुरुस्तीच झाली नसल्याचे दिसून येत आहे.

१२ वाहनांचा ताफा

देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने राज्य सरकारला मारिशसच्या पंतप्रधानांच्या दौऱ्याची माहिती १४ एप्रिल रोजीच दिली होती. ज्यामध्ये पंतप्रधानांसाठी मर्जिडीज एस क्लास वाहनांची अपेक्षा असल्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता. त्याशिवाय पायलट कार, एस्कॉट, पाच वाहने त्यांच्या अधिकाऱ्यांसाठी, व्हीआयपीच्या लगेजसाठी वाहन, एम्ब्युलन्स आणि टेल कार असा एकूण सुमारे १२ वाहनांचा ताफा पंतप्रधानांच्या दौऱ्यामध्ये पुरवण्याबाबत केंद्राच्या परराष्ट्र मंत्रालयाने राज्याच्या राजशिष्टाचार विभागाला कळवले होते.

राजशिष्टाचार विभागावर प्रश्न

आता परदेशातील पंतप्रधानांना शासनाच्या सुरक्षित वाहनाऐवजी भाड्याच्या वाहनांमध्ये असुरक्षितरीत्या भारताचा दौरा करावा लागत असल्याने भारताच्या परराष्ट्र धोरणांसह राज्याच्या राजशिष्टाचार विभागावर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :VehiclePrime Minister
go to top