
वाशी रेल्वे पोलिसांकडून दोन गुन्ह्यांची उकल
मानखुर्द, ता. २१ (बातमीदार) ः वाशी रेल्वे पोलिसांनी मंगळवारी (ता.१९) घडलेल्या दोन गुन्ह्यांची उकल केली. बॅग हिसकावण्याच्या गुन्ह्यात रुस्तम शेख (वय १९) याला अटक करण्यात आली असून मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील अल्पवयीनची भिवंडी येथील बालगृहात रवानगी करण्यात आली आहे.
मानखुर्दच्या चिता कॅम्प परिसरात राहणारी बालम्मा नांनय्या (वय ६३) ही महिला छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून लोकलने मानखुर्द स्थानकात उतरली. त्या वेळी गाडी सुटताना रुस्तमने तिच्या हातातील बॅग हिसकावून पळ काढला. त्या बॅगमध्ये महत्त्वाची कागदपत्रे, मोबाईल तसेच रोख रक्कम होती. तांत्रिक तपास तसेच खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे त्याला मानखुर्दच्या मंडाळा परिसरातून पोलिसांनी अटक करत चोरलेली बॅग आतील साहित्यासह जप्त केली. त्याच्याविरोधात वडाळा रेल्वे पोलिस ठाण्यात आधीच्या गुन्ह्याची नोंद असून त्या गुन्ह्यात तो नुकताच तुरुंगातून सुटून आला होता. मानखुर्दच्या पीएमजीपी वसाहतीतील रहिवासी मोहित गुप्ता मानखुर्दवरून वाशीला येत असताना त्यांचा मोबाईल खिशातून काढून घेण्यात आला होता. त्यांनी वाशी रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर खबऱ्यांमार्फत चोराचा शोध घेण्यात आला. तो वाशी परिसरातच सापडला. चौकशीदरम्यान तो अल्पवयीन असल्याचे समोर आले. त्याच्याकडून चोरलेला मोबाईल जप्त करून त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..