
गावठी कट्टा विकण्यासाठी आलेल्या दोघांवर झडप
उल्हासनगर, ता. २१ (वार्ताहर) : गावठी कट्ट्यासह जिवंत काडतुसे विकण्यासाठी आलेल्या दोघांना हिल लाईन पोलिसांनी अटक केली आहे. त्यांचा एक साथीदार फरार झाला असून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उल्हासनगरातील महेश्वरी हॉस्पिटलजवळ दोन व्यक्ती बुधवारी (ता. २०) सायंकाळी ६ ते ७ वाजण्याच्या सुमारास गावठी कट्टा विकण्यासाठी येणार असल्याची माहिती हिल लाईन पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिस पथकाने सापळा रचला होता. त्या वेळी रिक्षातून दोन व्यक्ती संशयास्पदरीत्या पाहत असल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे गावठी कट्टा आणि एक राऊंड जिवंत काडतूस आढळून आले. धीरज विठ्ठले, कृष्णा चव्हाण अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. इक्बाल शेख हा त्यांचा साथीदार घटनास्थळावरून फसार झाला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..