
अश्लील व्हिडीओप्रकरणी गुन्हा दाखल
नवी मुंबई, ता. २१ (वार्ताहर) : इन्स्टाग्रामवर लहान मुलाचा अश्लील व्हिडीओ अपलोड करणाऱ्या व्यक्तीविरोधात नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने उरण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. भरत गजानन घरत असे या व्यक्तीचे असून त्याने मे २०२१ मध्ये इन्स्टाग्रामवर लहान मुलाचा व्हिडीओ अपलोड केल्याचे तपासात आढळून आले आहे.
दिल्ली येथील राष्ट्रीय गुन्हे ब्युरोच्यावतीने बेपत्ता आणि पीडित मुलांच्या राष्ट्रीय केंद्राकडून मुलांचे अश्लील व्हिडीओ व फोटो अपलोड करणाऱ्यांचा शोध घेण्यात येतो. त्यानुसार १ मे २०२१ रोजी उरण भागात राहणाऱ्या एका व्यक्तीने इन्स्टाग्रामवरून एका लहान मुलासोबत एक प्राण्याचा अश्लील व्हिडीओ अपलोड केल्याचे आढळून आले होते. याबाबतची माहिती महाराष्ट्र सायबर सेलने नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलला दिली होती. त्यानुसार त्यांनी सदर व्यक्तीची माहिती काढली. त्यानुसार भरत घरत याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या व्यक्तीला अद्याप अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..