
ऋषीं माळी यांची नियुक्ती
कांदिवली, ता. २४ (बातमीदार) ः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाइं) चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कोषाध्यक्षपदी आणि रिपब्लिकन आगरी-कोळी आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी ऋषी चिंतामण माळी यांची नियुक्ती केली आहे. मुंबईतील शिंपोली गाव, बोरिवली पश्चिम येथे राहणाऱ्या माळी यांना आठवले यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असणारा रिपब्लिकन पक्ष उभा करण्यासाठी तसेच समाजाच्या सर्वांगीण विकासाचे कार्य करून रिपब्लिकन पक्ष व्यापक करण्यासाठी आपण प्रयत्न कराल, अशी आशा व्यक्त करत आठवले यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील पक्ष उभा करण्यासाठी सर्व जाती, धर्म आणि पंथांच्या नागरिकांना पक्षात सहभागी करण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..