मिटकरी यांच्याविरोधात निदर्शने

अमोल मिटकरी यांच्या निषेधार्थ अंबरनाथला अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने निदर्शने
amol mitkari
amol mitkarisakal
Published on

अंबरनाथ : आमदार अमोल मिटकरी यांच्या निषेधार्थ अंबरनाथला अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने घोषणाबाजी करून निदर्शने करण्यात आली. आमदार मिटकरी यांनी ब्राह्मण समाज आणि हिंदू विवाह पद्धतीमधील कन्यादान संस्कार पद्धतीवर गलिच्छ शब्दांत टीका केल्याच्या निषेधार्थ निदर्शने केल्याचे आंदोलकांच्या वतीने सांगण्यात आले.

श्रीकांत कर्वे, आप्पा कुलकर्णी, विजय खरे, वृंदा पटवर्धन, पराग वेलणकर आदींच्या उपस्थितीमध्ये वडवली विभागातील ब्राह्मण सभेसमोर आमदार मिटकरी यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर शिवाजीनगर पोलिसांना महासंघाच्या वतीने दिलेल्या निवेदनात समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com