
परुळेकर महाविद्यालयात पुस्तक दिन साजरा
कासा, ता. २४ (बातमीदार) ः तलासरी येथील कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्या वतीने शनिवारी (ता. २३) जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यात आला. या निमित्त प्रा. शिंदे यांचे उच्च शिक्षणात विद्यार्थ्यांच्या वाचन सवयी या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी ग्रंथालयामार्फत विद्यार्थ्यांसाठी पुस्तक प्रदर्शनदेखील आयोजित करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भगवान राजपूत यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कॉ. गोदावरी परुळेकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. प्रा. शिंदे जागतिक पुस्तक दिनाचे महत्त्व विषद करताना अवांतर पुस्तकांचेही वाचन करावे, असे प्रतिपादन केले. त्यामध्ये थोर नेत्यांचे चरित्र, आत्मचरित्र, कथा, कादंबरी, नाटक, वर्तमानपत्रे, नियतकालिक यांचेही वाचन करणे गरजेचे आहे, असे सांगितले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. डॉ. अर्जुन होन यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ठाकूर यांनी केले; तर आभार प्रा. डॉ. रावसाहेब पवार यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्रा. तुवर , प्रा. महेश माळवदकर, प्रा. नीलेश साळवे, प्रा. दीपक वाकडे आदी प्राध्यापक उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..