
डिझेल चोरट्याला ट्रेलर चालकांची बेदम मारहाण
नवी मुंबई, ता.२४ (वार्ताहर): उरणच्या जासई परिसरात उभ्या असलेल्या ट्रेलरच्या टाकीतील डिझेल चोरताना पकडल्या गेलेल्या अभिजित भानुदास सूर्यवंशी (३३) या चोरट्याला ट्रेलर चालकांनी बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली. या मारहाणीत सदर चोरटा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेत उरण पोलिसांनी जखमी अभिजितसह त्याच्या साथीदारावर डिझेल चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याला बेदम मारहाण करणाऱ्या ट्रेलर चालकाविरोधातदेखील गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेतील जखमी अभिजित हा मानखुर्द येथे राहण्यास असून त्याच्या मालकीची स्विफ्ट डिझायर कार आहे. सदर कार तो ट्रान्सपोर्टच्या व्यवसायासाठी वापरतो. काही वर्षांपूर्वी त्याची ओळख सैराज याच्यासोबत झाल्याने २१ एप्रिल रोजी रात्री तो सैराज याला भेटण्यासाठी उलवे येथे आला होता. त्यानंतर दोघेही पहाटे २ वाजण्याच्या सुमारास स्विफ्ट डिझायर कारने जासई येथे गेले होते. त्यानंतर या दोघांनी सहारा हॉटेल शेजारी उभ्या असलेल्या ट्रेलरच्या डिझेल टाकीचे लॉक तोडून त्यातून डिझेल चोरी करण्यास सुरुवात केली. यादरम्यान, सदर प्रकार ट्रेलर चालकाने पाहिल्यानंतर आरडाओरड सुरू केली.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..