
नियमबाह्य विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी
मुंबई : मुंबईसह राज्यातील शहरात मोठ्या प्रमाणावर नियमबाह्य आणि बेकायदेशीर विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बसच्या सर्व वाहनांची तपासणी करण्याच्या सूचना परिवहन आयुक्तांनी केल्या आहेत. त्यामुळे राज्यात अशी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर येत्या काळात मोठ्या प्रमाणात कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई, ठाणे, पुणे आदी शहरांत आणि ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर स्कूल बसच्या आसन क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी कोंबून वाहतूक सुरू असते. परवाना नसलेल्या स्कूल बसमधूनही बेकायदेशीरपणे विद्यार्थ्यांची शाळेत ने-आण सुरू आहे. त्यासाठी परिवहन विभागाकडे असंख्य तक्रारी आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर परिवहन आयुक्तांनी राज्यातील अशा सर्व बेकायदा वाहनांवर कठोर कारवाई करण्यासाठी सर्व प्रादेशिक व उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
कारवाईसाठी वाहतूक पोलिसांची मदत घेण्याची सूचनाही केली आहे.
मुंबई आणि परिसरात स्कूल बस, लहान आकाराची वाहने, रिक्षा आदींमध्ये शालेय विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक केली जात आहे. त्यासाठी काही टोळ्या सक्रिय आहेत. लाखो विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व प्रकार अत्यंत गंभीर असून अशा वाहनांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना परिवहन विभागाने दिल्या आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..