उल्हासनगरमध्ये मॉकड्रिलचा थरार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उल्हासनगरमध्ये मॉकड्रिलचा थरार
उल्हासनगरमध्ये मॉकड्रिलचा थरार

उल्हासनगरमध्ये मॉकड्रिलचा थरार

sakal_logo
By

उल्हासनगर, ता. २४ (वार्ताहर) ः पोलिसांच्या अंगावर शहारे आणणाऱ्या मॉकड्रिलचा अनुभव आज उल्हासनगरकरांनी घेतला. अग्निशमन दल, रुग्णवाहिका, पोलिसांच्या गाड्यांचे सायरन, पोलिस-बिट मार्शल पथकांची धावाधाव हे सर्व पाहून नागरिक हे नेमके काय सुरू आहे, या विचारात होते; पण हा मॉकड्रिल आहे हे लक्षात येताच नागरिकांना हायसे वाटले. हा थरार नागरिकांनी अनुभवला.

दक्षतेच्या उद्देशाने ठाणे पोलिस आयुक्तालयाने शहरनिहाय दंगल काबू योजना कार्यक्रम राबवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलिस उपायुक्त सुधाकर पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहायक पोलिस आयुक्त मोतीचंद राठोड यांच्या नेतृत्वाखाली मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. नियंत्रण कक्षातील बिनतारी यंत्रणेद्वारे सर्व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना वर्दळीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात तात्काळ पोहचण्याचा कॉल देण्यात आला होता. कॉल येताच मध्यवर्ती पोलिस ठाण्याचे बिट मार्शल चौथ्या मिनिटाला, सहायक पोलिस आयुक्त मोतीचंद राठोड आणि मध्यवर्ती पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, दोन अधिकारी आणि ३० पोलिसांसह पाचव्या मिनिटाला घटनास्थळी दाखल झाले.

----------
कॉल येण्याच्या अवघ्या चार ते दहा मिनिटांत वरिष्ठ पोलिस निरीक्षकांसोबत पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक हे ८० पोलिस कर्मचारी आणि बिट मार्शल घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणू शकतात. हे मॉकड्रिलच्या रंगीत तालमीवरून स्पष्ट झाले आहे.
- मोतीचंद राठोड, सहायक पोलिस आयुक्त.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top