आरमाईट कॉलेजमध्ये जागतिक वसुंधरा दिन साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरमाईट कॉलेजमध्ये जागतिक वसुंधरा दिन साजरा
आरमाईट कॉलेजमध्ये जागतिक वसुंधरा दिन साजरा

आरमाईट कॉलेजमध्ये जागतिक वसुंधरा दिन साजरा

sakal_logo
By

किन्हवली, ता. २४ (बातमीदार) ः जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून शहापूर वन विभाग-वन परिक्षेत्र धसई, आऊल कन्झर्वेशन फाऊंडेशन, रोटरी क्लब ऑफ कल्याण, आरमाईट कॉलेज आणि युवा कला मंच शहापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आरमाईट कॉलेज येथे ‘आपली वसुंधरा, आपली जैवविविधता’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. धसईचे वनपरिक्षेत्र अधिकारी दर्शन ठाकूर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देत विद्यार्थिदशेपासूनच त्यासाठी प्रयत्न सुरू करण्याचे आवाहन केले.

या वेळी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळ सदस्य रोहिदास डगळे, वनपरिक्षेत्र अधिकारी दर्शन ठाकूर, रोटरी क्लब ऑफ कल्याण अध्यक्ष अरुण सपकाळे, रोटरीचे प्रकल्प प्रमुख दिलीप कर्डेकर, सदस्य आत्माराम घाणेकर, सर्पमित्र प्रशांत शिरळ आणि युवा कला मंच शहापूर या संस्थेचे दिग्दर्शक, जीवन कौशल्ये प्रशिक्षक कृणाल जाधव, आरमाईट कॉलेजच्या सहाय्यक संचालक विद्युल्लता मोहिते, तसेच शिक्षकवृंद आणि वन विभाग कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top