
वसईच्या महिलांचा विदेशात लाखोंचा व्यवसाय
वसई, ता. २४ (बातमीदार) ः वसई विरार शहरातील महिलांनी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर दुबई, मॉरिशस या देशांमध्ये लाखो रुपयांचा व्यवसाय सुरू केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा अनुभव गाठीशी असल्यामुळे या महिलांचा आत्मविश्वास दुणावला आहे. भविष्यात विविध देशांत उद्योगविस्तार करण्याचा निर्धार महिला उद्योजिकांनी केला आहे.
वसई विरार शहरातील अनेक महिला घरगुती वस्तू तयार करतात. घरीच तयार केलेल्या या वस्तूंची चांगल्या प्रकारे विक्रीदेखील होते. काही दिवसांपूर्वी वसईच्या २० महिला दुबई येथे भारतीय कपडे, आभुषणे, बॅग, कापडी पिशव्या यांसह विविध वस्तूंची विक्री करण्यासाठी प्रदर्शनात सहभागी झाल्या होत्या. दुबईच्या नागरिकांनी याला भरघोस प्रतिसाद दिला. प्रदर्शनात झालेल्या विक्रीत महिलांना एकूण ४ लाखाची कमाई झाली. या वेळी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मार्केटिंग, उद्योग, वैशिष्ट्ये याबाबत दुबई येथील अनेक उद्योजकांचे मार्गदर्शनदेखील महिलांना मिळाले. यापूर्वी मॉरिशस येथे २०१९ मध्ये वसईच्या महिलांनी वस्तू विक्री प्रदर्शनात भाग घेतला होता.
------------------------------
दुबईमध्ये अनेक संस्था, नागरिकांनी या महिलांना उद्योगात मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. ऑनलाईन माध्यमातून महिलांनी तयार केलेल्या वस्तूंची माहिती आणि छायाचित्रे पाठवून त्याद्वारे मालाची विक्री केली जाणार आहे. याकरिता मेलचा वापर करून महिलांना दिलेले प्रशिक्षण व मालाची किंमत पाठवली जाणार आहे.
--------------------------
आंतरराष्ट्रीय बाजारात मालाची विक्री करण्याचा अनुभव चांगला आहे. दोन देशातील नागरिकांनी प्रतिसाद उत्तम दिला. अन्य देशात भारतीय वस्तूंसाठी प्रदर्शन भरवण्यासाठी मागणी आहे. महिलांचे सक्षमीकरण होण्यास यामुळे निश्चितच फायदा होत आहे.
- किरण बडे, उद्योजिका तथा अध्यक्षा, समृद्धी महिला बचत गट
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..