Fri, May 20, 2022

सोमय्या यांच्या वाहनचालकावर गुन्हा
सोमय्या यांच्या वाहनचालकावर गुन्हा
Published on : 24 April 2022, 3:38 am
मुंबई, ता. २४ ः मुंबई पोलिसांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या वाहनचालकाविरुद्ध २७९ (बेदरकारपणे गाडी चालवणे) आणि ३३७ (दुसऱ्याची सुरक्षितता संकटात आणणे) अशा कलमांअंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. खार पोलिस ठाण्यात राणा दाम्पत्याची भेट घेतल्यानंतर बाहेर पडणाऱ्या सोमय्या यांची गाडी थांबवण्याचा प्रयत्न तिथे जमलेल्या शिवसैनिकांनी केला. मात्र, चालकाने गाडी पळवली. त्यात शिवसैनिक जखमी झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
अपघातात शिवसेना नगरसेवकाच्या पायाला दुखापत झाली असून एका कार्यकर्त्याला किरकोळ मार लागल्याची तक्रार शनिवारी रात्री खार पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी रविवारी (ता. २४) सोमय्या यांच्या वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला.
Web Title: Todays Latest Marathi News
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..