महामार्गावर अग्निशमन यंत्रणेचा वनवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महामार्गावर अग्निशमन यंत्रणेचा वनवा
महामार्गावर अग्निशमन यंत्रणेचा वनवा

महामार्गावर अग्निशमन यंत्रणेचा वनवा

sakal_logo
By

कासा, ता. २५ (बातमीदार) ः मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दापचरी ते धुंदलवाडीदरम्यान मुंबई वाहिनीवर सोमवारी दुपारी ११ वाजण्याच्या सुमारास एका मालवाहू ट्रकच्या केबिनला आग लागण्याची घटना घडली. ही माहिती पोलिसांना कळवण्यात आल्यानंतर वापी येथील अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. दीड तासाने अग्निशमनचे बंब आल्यावर आग नियंत्रणात आणण्यात आली; परंतु तोपर्यंत वाहनाचे व मालाचे मोठे नुकसान झाले होते. महामार्गालगत अग्निशमन दलाचे केंद्र नसल्याने महामार्गावर अनेकदा वाहनांना लागलेल्या आगीच्या घटनेत वाहनांचे मोठे नुकसान होत आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सध्या मनोर ते आछाड दरम्यान अनेकदा वाहनांना आग लागण्याच्या घटना घडून वाहने आगीत जळून खाक झाली आहेत. या महामार्गावरून अनेक मालवाहू वाहने धावत असून अत्यंत ज्वलनशील रसायनांची वाहतूक करणारे ट्रक, इंधन वाहतूक करणारी वाहने वाहतूक करतात. त्यामुळे अनेकदा या वाहनांना आग लागण्याच्या घटना घडतात; परंतु मनोर ते जकात नाकादरम्यान कोणतेही अग्निशमन दलाचे केंद्र नसल्याने आग लागून वाहनांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे महामार्गावर अग्निशमन दलाची वाहने असावीत, अशी मागणी वाहनचालक करतात. मनोर ते तलासरी दरम्यान वाहनास आग लागल्यास ३० ते ५० किमी अंतरावर असलेल्या पालघर नगरपरिषद, बोईसर एमआयडीसी, डहाणूतील अदाणी कंपनी किंवा गुजरातमधील जीआयडीसीमधील अग्निशमन दलास पाचारण करावे लागते. हे पंप पोहोचण्यास १ तासाच्या आसपास कालावधी लागतो. या दरम्यान वाहने जळून खाक होतात.

चारोटी नाका येथे यापूर्वी गॅस टँकरला आग लागून मनुष्यहानी झाली होती; तर सामोटा येथे मोबाईल बॅटरी वाहक ट्रक आगीत खाक झाला होता. याशिवाय अन्य अनेक लहान-मोठ्या आगी लागल्या आहेत; परंतु जवळपास अग्निशमन दलाचे केंद्र नसल्याने त्यांना ताबोडतोब मदत मिळाली नाही. त्यात सध्या कडक उन्हाळा असल्याने वाहनात काही यांत्रिक बिघाड झाल्यास वाहनांना आग लागण्याच्या घटना वाढल्या आहेत.

महामार्ग प्रशासनास आम्ही अनेक वेळा मनोर ते तलासरी दरम्यान अग्निशमन दलाची सोय असावी, अशी मागणी केली आहे. अग्निशमन दल आसपास नसल्याने वाहनांना आग लागल्यास मोठे नुकसान होते. आम्ही पुन्हा प्रशासनाकडे याबाबत मागणी करणार आहोत.
- हरबन्स नन्नडे, महाराष्ट्र-वाहन चालक मालक संघ, अध्यक्ष

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top