
अलिबागमध्ये आयएमए अलिबागतर्फे मॅमोग्राफी शिबिर
अलिबाग, ता. ७ : इंडियन मेडिकल असोसिएशन अलिबाग आणि ऑनकोर्स कॅन्सर सेंटर, पनवेलच्या संयुक्त विद्यमाने अलिबागमध्ये आयोजित केलेल्या मॅमोग्राफी शिबिराचे उद्घाटन पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ३५ स्त्रियांची मॅमोग्राफी करण्यात आले.
स्त्रियांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. यामुळे काही स्त्रियांना जीवही गमवावा लागला आहे. अलिबागमध्ये शुक्रवारी आयोजित कँपसाठी मॅनोग्राफी व्हॅन मुंबईतून मागविण्यात आली होती. मॅमोग्राफीमध्ये स्तनाच्या कॅन्सरचे लवकर निदान होते. उपचार लवकर मिळाल्यास हा आजार पूर्ण बरा होऊ शकतो. आयएमए अलिबागचे अध्यक्ष डॉ. विनायक पाटील, सचिव डॉ. राहुल म्हात्रे व डॉ. समीर नाईक यांच्या पुढाकाराने हे शिबिर घेण्यात आले. यासाठी कर्करोग तज्ज्ञ डॉ. सलिल पाटकर यांचे विशेष सहकार्य लाभले.