दुर्मिळ वाळू सापाला जीवदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुर्मिळ वाळू सापाला जीवदान
दुर्मिळ वाळू सापाला जीवदान

दुर्मिळ वाळू सापाला जीवदान

sakal_logo
By

पाली, ता. ७ (वार्ताहर) : रोहा तालुक्यातील कोलाडजवळील ढगलवाडीजवळ एका फार्म हाऊसमध्ये दुर्मिळ असलेला वाळू साप शुक्रवारी (ता. ६) शिरला होता. या सापाला सर्पमित्र सागर दाहिंबेकर याने वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुखरूप नैसर्गिक आवासात सोडून दिले. सागर यांना फ्रेंड्स ऑफ नेचर संस्थेचे सदस्य राकेश शिंदे यांनी कॉल करत ढगलवाडीजवळ एका फार्म हाऊसमध्ये साप असल्याची माहिती दिली होती. तेथील स्थानिक युवकाने त्या सापाला प्लास्टिक बाटलीमध्ये पकडून ठेवले होते. राकेश शिंदे यांनी सागरला त्या सापाची ओळख सांगितली. तो वाळू साप प्रकारातील असल्याची खात्री सागर यांना पटली. हा साप मुख्यतः गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश व महाराष्ट्रात आढळून येतो, पण रायगड जिल्ह्यामध्ये हा साप दिसण्यास फार दुर्मिळ आहे. तसेच तो बिनविषारी असून निरुपद्रवी आहे, असे सागर दाहिंबेकर यांनी सांगितले.