अनुराधा गोरे यांचे व्याख्यान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनुराधा गोरे यांचे व्याख्यान
अनुराधा गोरे यांचे व्याख्यान

अनुराधा गोरे यांचे व्याख्यान

sakal_logo
By

अनुराधा गोरे यांचे व्याख्यान
अलिबाग, ता. १२ : नेहरू युवा केंद्र, रूरल अँड यंग फाउंडेशन आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिन सप्ताह साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त शुक्रवारी (ता. २०) सकाळी ठीक ११ वाजता अलिबाग येथील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ भाग्यलक्ष्मी हॉलमध्ये अवघ्या २४ व्या वर्षी देशासाठी प्राणार्पण केलेल्या शहीद कॅप्टन विनायक गोरे यांच्या मातोश्री अनुराधा गोरे यांचे युवकांना प्रेरित करणारे ''देशाचे भविष्य तुमच्या हाती'' या विषयावर आधारित व्याख्यान होणार आहे. हा कार्यक्रम वेळेत सुरू होईल. कार्यक्रमासाठी विनामूल्य प्रवेशिका वितरणाची व्यवस्था केली आहे. त्यासाठी ७०३०५००१७५ या क्रमांकावर संपर्क साधावा. सभागृहाच्या क्षमतेनुसार कार्यक्रमासाठी ५०० व्यक्तींनाच प्रवेश देण्याची व्यवस्था आहे. याची सर्व युवकांनी आणि श्रोत्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
***