अलिबागच्या परी काटकरची भरारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अलिबागच्या परी काटकरची भरारी
अलिबागच्या परी काटकरची भरारी

अलिबागच्या परी काटकरची भरारी

sakal_logo
By

अलिबाग, ता. ९ (बातमीदार) ः पुण्यात नुकतीच एक दिवसीय उपग्रह निर्मिती कार्यशाळा पार पडली. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा घेऊन १०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यात कुरूळ येथील आरसीएफ विद्यालयात नववीत शिकणाऱ्या परी संदेश काटकर हिने आठवी रँक मिळवली आहे. तिची चेन्नई येथे स्पेस झोन इंडियामार्फत होणाऱ्या वर्कशॉपसाठी निवड झाली आहे.
डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन, रामेश्वरम या संस्थेमार्फत दर दोन वर्षांनी राष्ट्रीय मोहीम राबविण्यात येतात. या वर्षी १५० पिको सॅटेलाइट व रॉकेट तयार करण्याची मोहीम संस्थेने घेतली. एपीजे एसएलव्ही लाँच व्हेईकल मिशन २०२३ साठी देशभरातून पाच हजार विद्यार्थ्यांनी मोहिमेत सहभाग घेतला होता. दहा दिवस त्यांचे झूमद्वारे ऑनलाइन प्रशिक्षण घेण्यात आले. मार्टिन ग्रुप तर्फे परीला शिष्यवृत्तीही मिळाली आहे.