पेणमधील आरटीओची सुरक्षा वाऱ्यावर

पेणमधील आरटीओची सुरक्षा वाऱ्यावर

Published on

अलिबाग, ता. ९ (बातमीदार) ः आगीच्या घटना रोखण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक सरकारी कार्यालयाचे फायर ऑडिट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र पेण येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय याबाबत उदासीन दिसत आहे. अग्‍निशमन यंत्राची मुदत संपली तरी कार्यालयातील यंत्राचे रिफिलिंग करण्यात आलेली नाही.
रायगड जिल्ह्यात उपप्रादेशिक परिवहन विभागाचे कार्यालय पेणमध्ये आहे. या कार्यालयाच्या अखत्यारित अलिबाग, पेण, पाली, माणगाव, श्रीवर्धन, महाड, म्हसळा, तळा, पोलादपूर आदी तालुक्यांचा समावेश आहे. वर्षाला सुमारे २५ हजार दुचाकी तर दहा हजारांपेक्षा अधिक तीन चाकी, चारचाकी वाहने खरेदी होऊन त्याची नोंदणी पेण येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयात केली जाते.
पेण येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयात दिवसाला एक हजारापेक्षा अधिक नागरिक वाहन नोंदणी, परवाना आदी कामांसाठी येतात. या कार्यालयात फाईलचा ढिगारा आहे. नागरिक, कर्मचारी, व कार्यालयाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अकस्मात आग लागल्‍यास कार्यालयात दोन अग्‍निशमन यंत्रे बसविण्यात आले आहेत. त्यात एक यंत्र उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कार्यालयासमोर तर दुसरे पहिल्या मजल्यावर चढताना आहे. या दोन्ही यंत्राची मुदत संपली आहे.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पेण-खोपोली मार्गावर रस्त्याच्या बाजूलाच आहे. या मार्गावरून पादचाऱ्यांसह वाहनांची वर्दळ असते. तसेच आजूबाजूला लहान-मोठे व्यवसायही सुरू आहेत. कोट्यवधीचा महसूल गोळा करणाऱ्या कार्यालयाच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे. पेण येथील उपप्रादेशिक कार्यालय एका खासगी इमारतीत एखादी दुर्घटना घडल्‍यास, संगणक व कागदपत्रांचे मोठे नुकसान होऊ शकते.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे फायर ऑडिट झाले की नाही, याबाबत माहिती घेतो. फायर एक्‍स्‍टिंगिशरची मुदत संपली असल्यास ते रिफिल करण्याच्या सूचना केल्‍या जातील. नागरिक, कर्मचारी व कार्यालयाच्या सुरक्षेसाठी फायर ऑडिट करण्याबाबत तातडीने अंमलबजावणी केली जाईल.
- महेश देवकाते, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.