
धोत्र्याचे पान खाल्याने इसमाचा मृत्यू धोत्र्याचे पान खाल्याने इसमाचा मृत्यू
पाली, ता. २३ (वार्ताहर) : सुधागड तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणच्या घटनांत तिघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोघांचा विषारी औषध प्राशन करून व एकाचा धोत्र्याचे पान खाल्ल्याने मृत्यू झाला. याबाबत पाली पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कानसळ गावातील सुरेश सखाराम घोगरकर यांनी काही दिवसांपूर्वी झाडाला फवारणी करण्याचे विषारी औषध प्राशन केले. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याने उपचारासाठी त्यांना रायगड जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग येथे दाखल करण्यात आले होते. मात्र शरीरात मोठ्या प्रमाणावर विष भिनल्याने त्यांचा मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत पाली येथील सत्यवान मधुकर पेडणेकर या तरुणाने नैराश्यातून उंदीर मारण्याचे औषध प्राशन केले होते. त्याला उपचारासाठी एमजीएम रुग्णालय, कामोठे येथे दाखल केले होते. मात्र त्याचा मृत्यू झाला.
तिसऱ्या घटनेत सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा येथील रहिवासी सुरेश नामदेव पंडित (वय ५४) यांनी धोत्र्याचे पान खाल्ल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांना उपचारासाठी एमजीएम रुग्णालय, कामोठे येथे दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.