कुरूळ येथे अस्थिघनता शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुरूळ येथे अस्थिघनता शिबिर
कुरूळ येथे अस्थिघनता शिबिर

कुरूळ येथे अस्थिघनता शिबिर

sakal_logo
By

अलिबाग, ता. २५ : आरसीएफ एक्स एम्प्‍लॉइज सोशल फोरम ही आरसीएफ थळमधून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी स्थापन केलेली संघटना आहे. या संघटनेतील सदस्यांसाठी कुरूळ येथील आरसीएफ कॉलनीमध्ये अस्थिघनता शिबिराचे आयोजन केले होते. यात २३५ जणांची अस्थिघनता तपासण्यात आली.
जुलै २०१५ मध्ये स्थापन झालेल्या या संघटनेचे सुमारे ७०० सेवानिवृत्त कर्मचारी सभासद आहेत. संघटनेची मासिक सभा दर संकष्ट चतुर्थीला आरसीएफ कुरूळ कॉलनीमधील गणेश मंदिरात होत असते. अस्थिघनता तपासणी वयोवृद्धांसाठी एक आवश्यक बाब ठरते. हेच लक्षात घेऊन संघटनेने सभासद पती-पत्नी करता हे शिबिर आयोजित केले होते. शिबिराचे उद्‍घाटन आरसीएफचे उपमहाव्यवस्थापक डॉ. जानी यांनी केले. आपल्या उद्‍घाटन भाषणात त्यांनी अस्थिघनतेचे महत्त्व विशद केले आणि त्यासाठी कोणती काळजी घ्यावी, या संबंधीचे थोडक्यात मार्गदर्शनही केले. फोरमतर्फे वेळोवेळी करण्यात आलेल्या विविध उपक्रमांचेही त्यांनी याप्रसंगी कौतुक केले. शिबिरात एकंदर २३५ सभासद पती-पत्नीची तपासणी करण्यात आली. शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. जी. टी. पाटील, फोरमचे सर्व कार्यकारी सभासद व वैद्यकीय विभागाचे सेवानिवृत्त सदस्यांनी मोलाचा हातभार लावला.