
मैदानावरील वर्चस्वासाठी रायगड सज्ज
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ८ : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रायगडचा सीनियर क्रिकेट संघ जाहीर करण्यात आला आहे. संघाच्या कर्णधारपदी अभिषेक खातू याची निवड करण्यात आली असून रत्नागिरी, लांजा व मालवण येथे संघाचे सामने खेळवण्यात येणार असल्याची माहिती रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते यांनी दिली आहे.
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे २५ व २६ जानेवारी रोजी पेण नगर परिषदेच्या मैदानावर निवड चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीतून ४५ जणांची निवड करण्यात आली. त्यांचे तीन संघ तयार करून रिलायन्स इंडस्ट्रीज नागोठणे येथील मैदानावर या तीन संघांचे सामने खेळवण्यात आले. त्यातून २५ जणांची निवड करून त्यांचे सराव शिबिर रिलायन्स इंडस्ट्रीज नागोठणे येथील मैदानावर घेण्यात आले. त्यापैकी रत्नागिरीत होणाऱ्या पहिल्या सामन्यासाठी १४ जणांची निवड करण्यात आली आहे.
-----------------------------------------
रायगडचा संघ ः
अभिषेक खातू (कर्णधार), हर्ष मोगाविरा, मल्हार वंजारी, प्रतीक म्हात्रे, निकुंज विठलानी, देवांश तांडेल, समीर आवासकर, तहा चिचकर, रितेश तिवारी, विक्रांत जैन (यष्टिरक्षक), सुबोध शिवलकर, विघ्नेश पाटील, श्रीशैल्य माळी, सुमीत सोनवडेकर. राखीव ः उत्तम परमार, संकेत गोवारी, अभिषेक पाटील, भावेश पाटील, अनिकेत कामत, यश माने, सौरभ साळवी, राहुल नवखारकर, अभिषेक जैन, यश पाटील, नशीब नाईक.