घोडपापड शाळेचे रूप पालटले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घोडपापड शाळेचे रूप पालटले
घोडपापड शाळेचे रूप पालटले

घोडपापड शाळेचे रूप पालटले

sakal_logo
By

पाली, ता. १३ (वार्ताहर) : सुधागड तालुक्यातील वऱ्हाड-जांभूळपाडा ग्रामपंचायत हद्दीतील घोडपापड जिल्हा परिषद‎ शाळेचे रूपडे इनरव्हील क्लब बॉम्बे वेस्ट यांच्या पुढाकारातून पालटले‎ आहे. इनरव्हील क्लब बॉम्बे वेस्ट यांनी आतापर्यंत शाळेला ११‎ लाखांहून अधिक रुपयांचा खर्च केला आहे.
घोडपापड शाळेला निधी उपलब्ध होताच येथील भिंती बोलक्या झाल्या आहेत. विद्यार्थ्यांसाठी शौचालय, किचन शेड, खेळण्यासाठी मैदान, नवीन वर्गखोली, शाळेची रंगरंगोटीचे काम करण्यात आले आहे. याचा उद्‍घाटन सोहळा क्लबच्या अध्यक्षा सेजल रावल, सचिव डॉ. कविता रेगे, वऱ्हाड-जांभूळपाडा ग्रामपंचायत सरपंच श्रद्धा कानडे, उपसरपंच महेश गिरी, सदस्य सुनील वाघमारे, माजी सदस्य काशिनाथ पवार आदींच्या उपस्थितीत नुकताच पार पडला. यावेळी मुलांना शैक्षणिक साहित्यासह खाऊ वाटप करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी जांभूळपाडा केंद्राचे केंद्रप्रमुख आनंद पाटील, सुरेश तुरे, ज्येष्ठ शिक्षक सुरेश ठोंबरे, किशोर पाटील, श्रीकांत फुंदे, मनसजन कोकणी, समीर भांड, ज्ञानेश्वर चाटे, आशा शिंदे, सागर शिंदे, यांच्यासह ग्रामस्थ व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार उपशिक्षक श्रीकांत फुंदे यांनी मानले.

घोडपापड ही शाळा पहिली ते चौथीपर्यंत आहे. वर्षभरापूर्वी शाळेला भेट दिल्यानंतर मला व माझ्या टीमला शाळेत काम करावेसे वाटले. या शाळेत आदिवासी वाडीवरील मुलांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी शाळेचे रूपडे‎ पालटले आहे.
- सेजल रावल, अध्यक्षा, इनरव्हील क्लब बॉम्बे वेस्ट