सुधागडमध्ये कमळ फुलाला बळकटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुधागडमध्ये कमळ फुलाला बळकटी
सुधागडमध्ये कमळ फुलाला बळकटी

सुधागडमध्ये कमळ फुलाला बळकटी

sakal_logo
By

पाली, ता. २७ (वार्ताहर) : जांभूळपाडा येथे पार पडलेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादीची मोठी फळी भाजपनेत्या गीता पालरेचा यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये सामील झाली आहे. आमदार रवींद्र पाटील व माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी पक्षप्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. या प्रवेशामुळे रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठा हादरा बसला आहे.
सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा, माणगाव बुद्रुक, दहिगाव, चिवे, खांडपोली, नवघर आदी सहा ग्रामपंचायतीतील सरपंच, उपसरपंच, सदस्य व इतर पक्षांचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सुधागडातील विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा ओघ भाजपकडे आहे. दिवसेंदिवस भाजपमध्ये इनकमिंग वाढत असून आगामी सर्व निवडणुकीत याचा मोठ्या प्रमाणावर लाभ होणार आहे. सुधागडात शेकाप व राष्ट्रवादीच्या प्रभावातील अनेक ग्रामपंचायतीतील कार्यकर्ते आता उत्स्फूर्तपणे कमळ हाती घेत आहेत. माझ्यावर विश्वास ठेवून मोठ्या संख्येने कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल होत आहेत, याचे समाधान गीता पालरेचा यांनी व्यक्त केले.
या वेळी युवा नेते वैकुंठ पाटील, भाजप दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, भाजप नेत्या गीता पालरेचा, सुधागड तालुका अध्यक्ष चंद्रकांत घोसाळकर आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या. भाजपने सर्व योजना राबवल्या. अडीच वर्षांत महाविकास आघाडीने काय विकासकामे केली? सुधागडच्या विकासासाठी खासदार सुनील तटकरे यांनी किती विकासनिधी आणला असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला. यापुढेही पेण सुधागड मतदारसंघात निधी कमी पडणार नाही अशी ग्वाही आमदार रवींद्र पाटील यांनी दिली. यावेळी रमेश साळुंके, यशवंत पालवे, जे. बी. गोळे, जांभुळपाडा ग्रामपंचायत सरपंच श्रद्धा कानडे, गणेश कानडे, विकास माने, केतन देसाई, आलाप मेहता, हरीचंद्र पाटील आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाजपच्या काळात विविध योजना गोरगरीब, सर्वसामान्य तळागाळातील लाभार्थी जनतेपर्यंत पोहचत आहेत. आपणही याच घटकांच्या उत्कर्षासाठी काम करतोय. त्यामुळे आपण भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
- माजी आमदार धैर्यशील पाटील

राजकीय प्रतिस्पर्धा संपली
पेण, सुधागड मतदारसंघात आमदार रवींद्र पाटील व माझी राजकीय प्रतिस्पर्धा होती. मात्र, महाराष्ट्रात प्रथमच असे घडले असावे की माजी आमदार व आजी आमदार भाजपमध्ये आले आहेत. या पक्ष प्रवेशाने अनेकांना वाईट वाटते. आपली ताकत कमी झाल्यासारखे वाटते. माझ्या शेकाप सोडण्याने जयंत भाईंनाही वाईट वाटले असेल, असे धैर्यशील पाटील म्हणाले.


पाली : प्रवेश कर्त्यांचे पक्षात स्वागत करतांना आमदार रवींद्र पाटील, माजी आमदार धैर्यशील पाटील, राजेश मपारा, गीता पालरेचा व वैकुंठ पाटील. (छायाचित्र, अमित गवळे)