मृगगड किल्ल्यावरून पडून ट्रेकर गंभीर जखमी

मृगगड किल्ल्यावरून पडून ट्रेकर गंभीर जखमी

पाली, ता. ३१ (वार्ताहर) : सुधागड तालुक्यातील मृगगड किल्ल्यावर चढताना पायऱ्यांवरून पाय घसरून खाली पडून रविवारी (ता. ३०) नवी मुंबईतील एक ट्रेकर गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. अदनान शफिक खान (वय ३०) असे जखमी ट्रेकरचे नाव आहे. त्याला शिवदुर्ग मित्र मंडळ लोणावळा व अपघातग्रस्तांसाठी असलेल्या सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी शर्थीचे प्रयत्न करून सुखरूप खाली आणले.
सुधागड तालुक्यातील मृगगड हा अवघड गड सर करण्यासाठी नवी मुंबई येथून रविवारी काही ट्रेकर आले होते. पावसामुळे निसरड्या झालेल्या पायरीवरून पाय सरकल्याने खाली पडून यातील ट्रेकर अदनान शफिक खान हा गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून गुडघा व खांद्यालाही जबर मार बसला आहे. गंभीर जखमी झालेल्या अदनानला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची आवश्यकता होती. अदनानला गडावरुन सुखरुप खाली आणणे अत्यंत जिकिरीचे व अवघड काम होते. शिवदुर्ग मित्र मंडळाचे सुनील गायकवाड यांनी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेला याबाबत माहिती दिली. त्यानंतर शिवदुर्ग मित्र मंडळ, लोणावळा व अपघातग्रस्तांसाठी असलेल्या सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. डोक्याला दुखापत, खांदा निखळणे, गुडघ्याला दुखापत झालेल्या अदनानला अवघड मृगगडावरून खाली गडाच्या पायथ्याशी आणून तात्काळ पनवेल येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com