police in action
police in action sakal

Police News: निवडणुक काळात पोलिस लागले कामाला; दहाही चेकपोस्टवर असणार दिवसरात्र नाकाबंदी

वाहनांसह कागदपत्रांची, चालकांची तपासणी

Alibag News: निवडणूक प्रचारादरम्यान अनेकवेळा वादाचे प्रसंग निर्माण होतात. शस्‍त्राची वाहतूक, मद्यवाहतूक, मतांच्या बदल्यात पैसे देण्यासाठी रोख रक्कमेची वाहतूक केली जाते. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, या गैरकृत्यांवर निर्बंध ठेवण्यासाठी रायगड पोलिसांनी १० चेकपोस्टवर कडक बंदोबस्त ठेवण्यास सुरुवात केली आहे.


चेकपोस्टवरून जाणाऱ्या प्रत्येक संशयास्पद वाहनांची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी १० पोलिस अधिकारी आणि ३० अंमलदारांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. रायगड जिल्ह्यात येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या वाहनांना यातील एका तरी चेकपोस्टवरून जावे लागेल, अशा ठिकाणी हे चेकपोस्ट उभारण्यात आले असून पोलिस कर्मचाऱ्यांसह सीसी टीव्हीची नजर येणाऱ्या वाहनांवर राहणार आहे.

police in action
Navi Mumbai Police: नवी मुंबई पोलिस गडचिरोलीत कर्तव्यावर; तीनशे अंमलदारांसह दहा अधिकारी जाणार

याचे पूर्ण नियोजन रायगड पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. याची अंमलबजावणी सुरु झाली असून दिवसरात्र बंदोबस्‍त असेल.
निवडणूक अर्ज दाखल करण्यात सुरुवात झाली असून २२ एप्रिलनंतर लढतीचे चित्र स्पष्ट होईल, त्‍यानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराला वेग येईल.

पक्षाचे नेते, कार्यकर्ते रात्री उशिरापर्यंत मतदारसंघात कार्यरत राहतील. दरम्‍यान, मद्य, शस्‍त्रे, रोख रकमेची बेकायदा वाहतूक होत असेल तर त्यांच्यावर निवडणूक आयोगाकडून गुन्हे दाखल करण्याचीही प्रक्रिया होणार आहे. सध्या राजकीय नेत्यांनी चेकपोस्टवरील बंदोबस्ताची चांगलीच धास्ती घेतल्‍याचे दिसून येत आहे.

police in action
Navi Mumbai Police: नवी मुंबई पोलिस गडचिरोलीत कर्तव्यावर; तीनशे अंमलदारांसह दहा अधिकारी जाणार

चेक पोस्ट / पोलिस ठाणे


शेलू / नेरळ
कळंब / नेरळ
सावरोली टोलनाका / खालापूर
खारपाडा / दादर सागरी
ताम्हाणी घाट / माणगाव
कशेडी / पोलादपूर
वरंध / महाड एमआयडीसी
आंबेत/ गोरेगाव
आंबेनळी घाट / पोलादपूर
मांडवा जेटी / मांडवा सागरी

police in action
Nashik Police : GPS मॉनिटेरिंगमुळे नाशिकची ‘स्मार्ट पोलिसिंग’! आयुक्तालयातील हजार स्पॉटला नियमित पेट्रोलिंग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com