वावे गावात ५३ घरांचे नुकसान

वावे गावात ५३ घरांचे नुकसान

पाली, ता. १४ (वार्ताहर) ः सुधागड तालुक्यातील वावे गावात सोमवारी झालेल्‍या वादळी पावसामुळे सर्वाधिक ५३ घरांचे नुकसान झाले आहे. व एक वृद्ध महिला जखमी झाली. मजरे-जांभूळपाडा येथील तीन घरांचे नुकसान झाले. याबरोबरच मुळशी ठाकूरवाडी, दहिगाव, वावे तर्फे आसरे, माणगाव बुद्रुक, करचुंडे येथील घरांचे कौल आणि पत्रे फुटले.
वादळामुळे काही गावातील बत्ती गुल झाली होती. सोसाट्याचा वारा व पावसामुळे घरांवरील सिमेंटचे पत्रे, कौल, पाईप उडाले. ते एका घरावरून दुसऱ्या घरावर पडल्‍याने मोठे नुकसान झाले. तर काही घरांच्या भिंती कोसळल्या. यात लाखोंचे नुकसान झाल्‍याचा प्राथमिक अंदाज आहे. महसूल प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्तांकडून करण्यात येत आहे. नायब तहसीलदार भारत फुलपगारे यांनी चिवे गावात घटनास्थळी जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करीत ग्रामस्थांशी चर्चा केली तसेच पंचनाम्याचा आढावा घेतला.

वादळी पावसामुळे गावातील घरांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी टळली. महसूल प्रशासनाने त्‍वरित पंचनामे करण्यास सुरुवात केली असून लवकरात लवकर भरपाई मिळणे अपेक्षित आहे.
- केतन म्हसके, वावे ग्रामस्‍थ

वादळी वाऱ्यासह पावसाने झालेल्या घरांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम प्रशासन स्तरावर सुरू करण्यात आले आहे. तलाठी व मंडळ अधिकारी यांना पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नुकसानग्रस्तांना जिल्हा स्तरावरून लवकर नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न करू.
- भारत फुलपगारे, नायब तहसीलदार, पाली-सुधागड

पाली ः सुधागड तालुक्यात वादळी पावसामुळे घरांचे नुकसान झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com