Raigad Fort: रायगडावरील पायवाट दोन दिवस बंद, वाचा काय आहे कारण
Raigad News: रायगड किल्ल्यावरील ३५१ वा शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी महादरवाज्याच्या खालील बाजूला असलेल्या उंच कड्यावरील मोकळे दगड काढण्याचे काम २३ व २४ मेदरम्यान करण्यात येणार आहे. या कामादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून सावधगिरीचा उपाय म्हणून किल्ले रायगडकडे जाणारी पायवाट दोन दिवसांसाठी बंद ठेवण्यात आली आहे.
किल्ले रायगडावर ३५१ वा शिवराज्याभिषेक सोहळा तारखेनुसार ६ जून व तिथीनुसार २० जून रोजी साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्यात राज्यभरातील नागरिक आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमापूर्वी महादरवाज्याच्या खालील बाजूस असलेल्या उंच कड्यावरील मोकळे दगड काढून घेणे आवश्यक आहे.
पण प्रशिक्षित रॅपलर्सच्या मदतीनेच हे काम शक्य असल्याने मुंबईच्या दुर्गवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून रायगडावर जाणाऱ्या पायरी मार्गावर संभाव्य दरड आपत्ती सौम्यीकरण उपाययोजना सुरू आहेत. या अनुषंगाने २३, २४ मे रोजी किल्ले रायगडावरील पायवाट बंद करण्याचे आदेश रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
पाऊस पडण्याची शक्यता असल्याने गडावरील काही भाग धोकादायक होईल, यासाठी दरड आपत्ती सौम्यीकरणातून काम होणे आवश्यक आहे. प्रशिक्षित रॅपलर्सची यासाठी मदत घेतली जाणार असून अनुचित प्रकार टाळण्यासाठी खबरदारी घेतली गेली आहे.
- किशन जावळे, जिल्हाधिकारी, रायगड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.