दोनशे किलोचा भंडाऱ्याची उधळण

दोनशे किलोचा भंडाऱ्याची उधळण

दोनशे किलोच्या भंडाऱ्याची उधळण
मतमोजणी केंद्राजवळ कार्यकर्त्यांच्या उत्‍साहाला उधाण

अलिबाग, ता. ४ ः पहिल्या फेरीपासूनच महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांनी थोड्या थोड्या मतांची आघाडी घेतली होती. सातव्या फेरी अखेरीस २२ हजारांची निर्णायक आघाडी घेतल्याचे समजताच कार्यकर्त्यांनी नेहुली येथील मतमोजणी केंद्राच्या आवारात गर्दी करण्यास सुरुवात केली. साधारण साडेनऊच्या सुमारास कार्यकर्ते उत्साहात येऊ लागल्याने पोलिसांनाही मतदान केंद्राकडे जाणारे रस्ते बंद करावे लागले.
राष्ट्रवादी, शिवसेना (शिंदेगट), भाजप, मनसे अशा महायुतीच्या घटक पक्षाच्या नेत्यांचा घोळका हळूहळू वाढू लागला. पंधराव्या फेरीपासूनच कार्यकर्त्यांनी फटाके फोडण्यास सुरुवात केली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी २०० किलोचा भंडारा एका जीपमधून उधळण्यासाठी आणला होता. भंडाऱ्याची उधळण करीत कार्यकर्ते बेभान होऊन नाचत होते. हा उत्साह प्रत्येक फेरीनुसार वाढतच गेला. २७ व्या फेरीपर्यंत ८० हजार ७५८ मतांनी आघाडी घेतल्याचे समजताच कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहचला. यावेळी पेणचे आमदार रवीशेठ पाटील, महाडचे आमदार भरत गोगावले, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

टपाली मतदानमध्ये ७४९ मतांची आघाडी
रायगड मतदारसंघाच्या बाहेर राहणाऱ्या मतदारांना पाठवलेल्या मतपत्रिका टपालाद्वारे पोहचल्या होत्या. यात सुनील तटकरे यांना २,४३१ मते तर अनंत गीते यांना १,८२३ मते मिळाली. यात ६०८ मतांनी तटकरेंकडे आघाडी होती. टपाली मतदानासाठी सेवेत असलेल्या एकूण ५,५१७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यातील ४,७६७ मते वैध ठरली. येथूनच तटकरेंच्या आघाडीला सुरुवात झाली.

नोटाला २७२७० मते
सुनील तटकरे, अनंत गीते यांच्यासह अन्य ११ उमेदवारापैकी एकालाही खासदारकीसाठी योग्य न समजता २७ हजार २७० मतदारांनी ‘नोटा’ मतदान केले. ही तिसऱ्या क्रमांकाची मतसंख्या आहे. पहिल्या दोन क्रमांकाच्या उमेदवारांनंतर वंचितच्या कुमुदिनी चव्हाण यांना चौथ्या क्रमांकाचे १९, ६१८ इतकी मते मिळाली आहेत. त्यानंतर पाच हजारांचा पल्ला अपक्ष श्रीनिवास मतपत्री-९३९४, अपक्ष उमेदवार अमित कावडे-५६३४ यांना गाठता आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com