ई-कुबेर प्रणालीने वेतन वाटपात सुसूत्रता

ई-कुबेर प्रणालीने वेतन वाटपात सुसूत्रता

Published on

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १ : जिल्हा परिषद शिक्षक व कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होत नसल्याची ओरड नेहमीच होते, मात्र ई-कुबेर प्रणालीमुळे जूनचे वेतन दोन दिवस आधीच झाल्‍याने शिक्षकांनी समाधान व्यक्‍त केले आहे. २८ जूनला सायंकाळी बहुतांश शिक्षकांच्या खात्यात वेतन जमा झाले. रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात पाच हजार ८७६ शिक्षक तर ४० केंद्रप्रमुख आहेत.
जानेवारी २०२४ पासून सीएमपी प्रणालीद्वारे राज्यातील शिक्षक व कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्त्याचे प्रदान स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मार्फत थेट खात्यात जमा करण्यात येतात. परंतु सीएमपी प्रणालीमुळे वेतन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही एक ते दोन दिवसाचा विलंब व्हायचा. यामुळे राज्याचे कोशागार संचालकांनी पाच एप्रिलला एक पत्र काढून आरबीआय बँकेचे ई-कुबेर प्रणालीने वेतन व भत्त्याचे प्रदान करण्याचे निर्देश राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना दिले होते. त्यानुसार एप्रिलच्या वेतनाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरही ई-कुबेर प्रणालीतील अडथळ्यामुळे एप्रिलचे वेतन शिक्षकांच्या खात्यात तीन दिवस विलंबाने ३ मे रोजी जमा करण्यात आले होते.
रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी डॉ. भरत बास्टेवाड, प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनिता गुरव, वित्त व लेखा अधिकारी राहुल कदम, शिक्षण व वित्त विभागातील सर्व कर्मचारी तसेच शालेय पथकाने विशेष प्रयत्न करून ई-कुबेर प्रणालीतील सर्व अडथळे दूर करून जूनची वेतन प्रक्रिया लवकरच पूर्ण केली. त्यामुळे ई-कुबेर प्रणालीने जूनमधील वेतन दोन दिवस आधीच (२८ जूनपासून) जमा झाल्‍याचे मेसेज शिक्षकांना आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.