जिल्ह्यात दिलासादायक पाऊस  28 लघु प्रकल्पांपैकी 13 पूर्ण क्षमतेने भरले जिल्ह्यातील नद्या धोका व इशारा पातळीच्या खाली

जिल्ह्यात दिलासादायक पाऊस 28 लघु प्रकल्पांपैकी 13 पूर्ण क्षमतेने भरले जिल्ह्यातील नद्या धोका व इशारा पातळीच्या खाली

Published on

२८ लघुप्रकल्पांपैकी १३ ओव्हरफ्लो

नद्या, नाल्‍यांची पातळी वाढली, मात्र इशारा रेषेच्या खाली

पाली, ता. ११ (वार्ताहर) ः जिल्ह्यात काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून आतापर्यंत सरासरी १०९१.३६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. २८ लघु प्रकल्पांपैकी १३ लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. नद्या, नाल्‍यांची पातळी वाढली असली तरी इशारा पातळी व धोका पातळीच्या खाली वाहत आहेत.
म्हसळा तालुक्‍यात गुरुवारी सर्वाधिक १५०९.० मिमी तर सर्वात कमी उरण येथे ७६२.० मिमी पावसाची नोंद झाली. अनुकूल वातावरणामुळे शेतकऱ्यांची भातलावणीची कामे वेगाने सुरू आहेत. जिल्ह्यात आपत्तीमुळे दोघांचा मृत्यू झाल्‍याची नोंद आहे. पेण तालुक्यातील सापोली येथील एकाचा झाड पडून, तर महाड-दादली येथे नदीत बुडून एकाचा मृत्यू झाल्‍याची नोंद आहे. पावसामुळे पशुधनाचेही नुकसान झाले असून म्हैस, रेडा व गाय मिळून ७ जनावरे मृत झाली आहेत. तर दोन गायी व दोन वासरे जखमी झाली आहेत.

१५५ नागरिक स्थलांतरित
आतापर्यंत ४७ कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले असून यात १५५ जणांचा समावेश आहे. महाड तालुक्यातील बिरवाडी येथील दोन कुटुंबातील पाच व्यक्ती नातेवाईकांकडे, तळा तालुक्यातील कडक्याची गाणी येथील २७ कुटुंबातील ७० व्यक्ती पिटसई येथील कुणबी समाज मंदिर येथे आणि मुरूड-राजापुरीतील १८ कुटुंबातील ८० व्यक्ती नातेवाईकांकडे असे मिळून १५५ नागरिक स्‍थलांतरित झाले आहेत.

एनडीआरएफ, एसडीआरएफ पथक सज्ज
आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. महाडमधील रमाई विहार येथे एनडीआरएफ व एसडीआरएफ पथक सज्ज आहे. यामध्ये २ निरीक्षक, ३ उपनिरीक्षक, २९ कर्मचारी असे मिळून ३४ जण तैनात आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.