मराठी संस्कृतीवरील हल्ला परतवून लावू

मराठी संस्कृतीवरील हल्ला परतवून लावू

Published on

मराठी संस्कृतीवरील हल्ला परतवून लावू
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे प्रतिपादन; युवा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २९ : ‘मराठी ही फक्त एक भाषा नाही, तर ती एक संस्कृती आहे. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे मराठी संस्कृतीवर कोणी हल्ला करीत असेल, तर तो आम्ही परतवून लावू, हिंदी भाषा रेटण्याचा सरकार प्रयत्न करीत आहे. तो कदापि सहन करणार नाही,’ असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी रविवारी ‘ओळख स्वतःची, विश्वाची व परिकल्पनेतील भारताची’ या विषयावर अलिबाग येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्या वेळी ते म्हणाले, ‘मी पूर्णवेळ एक कार्यकर्ता आहे. माणूस आणि प्राणी यांत निश्चितच फरक आहे. तो आपण समजून घेतला पाहिजे. भारतीय संस्कृती महान आहे. त्यामुळे आपण स्वतःला अधिकाधिक विकसित केले पाहिजे,’ ‘काँग्रेसची विचारधारा आणि आजपर्यंतची वाटचाल’ याविषयी माजी आमदार रामहरी रूपनवर, ‘काँग्रेस पक्ष स्थापना, उपलब्धी, काँग्रेसची देशाला गरज'' माजी आमदार उल्हास पवार, ‘पक्षाची विचारधारा, कार्यकर्त्यांना पक्षात संधी'' महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समिती सदस्य आणि प्रवक्ते सचिन सावंत आदींनी आपले विचार मांडले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शनिवारी रात्री काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सुमधुर गीतांचा आनंद घेतला. या वेळी उल्हास पवार, सचिन सावंत, यशराज पारखी यांचा सन्मान महेंद्र घरत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. हे प्रशिक्षण शिबिर आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली  यशस्वी  झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com