अलिबागमध्ये तिसरी घंटा वाजणार
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ३० : शहरातील पीएनपी नाट्यगृह लवकरच सुरू होत आहे. तीन वर्षांपूर्वी वेल्डिंगचे काम सुरू असताना ठिणगी पडून नाट्यगृहाला आग लागली होती. तेव्हापासून नाट्यगृह बंद असल्याने रसिकांचा हिरमोड झाला होता. आता नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, लवकरच पीएनपी नाट्यगृहात तिसरी घंटा वाजणार आहे.
नाट्यगृहाची दुरुस्ती आणि नूतनीकरणासाठी राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागाकडून नऊ कोटी ३२ लाख रुपयांचा निधी देण्यात आला होता. हा निधी मंजूर करताना सरकारने काही अटी घातल्या आहेत. त्या नाट्यगृह सांस्कृतिक कार्य विभागासाठी दरवर्षी सलग १० दिवस अथवा टप्प्याटप्प्याने विनामोबदला उपलब्ध करून द्यावा लागेल.
भविष्यात नाट्यगृहात कुठलीही दुर्घटना घडू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर नाट्यगृहाचा विमा काढण्याची कार्यवाही तातडीने करण्यात यावी, असे निर्देशही पीएनपी सहकारी सांस्कृतिक कला विकास मंडळाला देण्यात आले आहेत.
रायगड जिल्ह्यात नाट्यसंस्कृती खोलवर रुजली आहे. गावागावांमध्ये हौशी नाट्यमंडळे आहेत, या कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी हक्काचे ठिकाण नव्हते. जिल्ह्याचे मुख्यालय असतानाही अलिबागमध्येही नाट्यगृहाची उणीव भासत होती. पीएनपी नाट्यगृह आगीत भस्मसात झाल्यानंतर नव्या रूपात तयार होत आहे.
- चित्रलेखा पाटील, अध्यक्षा, पीएनपी सहकारी सांस्कृतिक कला विकास मंडळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.