घरठाण, वनहक्कांसाठी लढा

घरठाण, वनहक्कांसाठी लढा

Published on

घरठाण, वनहक्कांसाठी लढा
आदिवासी संघटनांकडून तहसिलदारांना निवेदन
अलिबाग, ता.१० : जागतिक आदिवासी दिनानिमित्त रायगड जिल्ह्यातील कातकरी समाजाच्या मुलभूत हक्कांसाठी विविध सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला. जागतिक स्तरावर आदिवासी समाजाच्या अस्तित्व, हक्क, आणि सांस्कृतिक ओळखीच्या संरक्षणासाठी स्थानिक पातळीवर कातकरींच्या घरठाण व वनहक्क प्रश्नांवरून शासनाला निवेदन देण्यात आले.
रायगडमधील अनेक कातकरी वस्ती आजही ‘अनधिकृत’ व ‘गैरकायदेशीर’ ठरवली जात आहे. त्यांना घरठाणाचा अधिकृत दर्जा मिळालेला नाही. त्यामुळे घरे, शासकीय योजनांचा लाभांपासून वंचित रहावे लागत आहे. वनहक्क कायद्यानुसारही त्यांच्या वैयक्तिक आणि सामूहिक मालकीच्या जमिनींचे हक्क आजतागायत दिले गेलेले नाहीत. अशातच पनवेल,उरण,पेण,कर्जत,अलिबाग तालुक्यातील जमिनींच्या किमती आवक्याबाहेर गेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अंकूर ट्रस्ट तीन दशकांपासून आदिवासी, वंचित, आणि हक्कवंचित समुदायांसोबत काम करत आहे. या संस्थेने लोकमंच, मकाम (महिला अधिकार मंच) आणि अन्य संघटनांच्या सहकार्याने एकत्र येत कातकरींच्या हक्कासाठी लढा सुरू केला आहे. याच अनुषंगाने पेण तहसीलदार, उपस्तर वनहक्क समितीला निवेदन देण्यात आले आहे.
़-----
कुळकायदा कलम १७ अंतर्गत कातकरींच्या झोपड्यांच्या खालील जमिनीबाबत अधिकृत दावे दाखल करण्यात आले आहेत. हे कलम आदिवासी व शेतमजुराना हक्क मिळवून देण्यास मदत करते. या कायदेशीर प्रक्रिया राबवताना आदिवासी संघटनांनी प्रशासनासोबत समन्वय साधत अधिकृत कागदपत्रे सादर करावी
- सचिन शेजाळ, तहसिलदार, पेण
---
नाच, गाणी ही आदिवासींची संस्कृती नाही. निसर्गाशी असलेला सलोखा आणि वैशिष्ट्यपूर्ण जीवनशैलीतून येणारे मूल्य ही त्यांची खरी ओळख आहे. दुर्दैवाने, खासगीकरण व जागतिकीकरणाच्या काळात ही ओळख पुसली जात आहे. हे टाळण्यासाठी आदिवासींनी संघटीतपणे प्रयत्न करणे आवश्यक आहेत.
- वैशाली पाटील, सामाजिक कार्यकर्त्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com