जिल्ह्यात गोपाळकाल्याची अनोखी परंपरा कुठे चाबकाचे फटके कुठे दावण तर कुठे विधायक उपक्रम ढाक्कुमाकुम व थरार
कुठे चाबकाचे फटके.. कुठे दावण
जिल्ह्यात गोपाळकाल्याची अनोखी परंपरा
पाली, ता. १४ (वार्ताहर)ः रायगड जिल्ह्यातील गोकुळाष्टमीनिमित्त आबालवृद्धांसह तरुणाईमध्ये उत्साह संचारला आहे. पारंपरिक पेहराव, वाद्यांच्या चालीवर श्रीकृष्ण जन्माचा उत्सव आनंदात साजरा केला जाणार आहे. या सणाला सांस्कृतिक तसेच धार्मिक महत्त्व असल्याने कुठे चाबकाचे फटके मारून, तर कुठे दावण धरून, तर कुठे विधायक उपक्रमातून गोपाळकाला साजरा होणार आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक गावात सण साजरे करण्याच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत. श्रीवर्धन तालुक्यात अनेक नवस गोकुळाष्टमीच्या दिवशी पूर्ण केले जातात. प्रत्येक पाखाडीतून स्वतंत्र दावण निघते. एकमेकांच्या हातांची गुंफण करत श्रीकृष्णाचा जयघोष करीत प्रत्येक पाखाडीतील लोक संपूर्ण गावभर भ्रमंती करतात. श्रीवर्धन गावातील प्रत्येक मंदिर, पाखाडीला भेट दिली जाते. दावण हा मैत्री, एकोपा, प्रेम, आपुलकी, स्नेह यांचे प्रतीक मानले जाते. दोन दिवस हा उत्सव चालतो. वाजत गाजत हाती गदा घेऊन फेरदेखील धरला जातो.
------------------------------------
अंगावर आसुडाचे फटके
सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा येथे अंगावर आसुडाचे फटके मारून दहीहंडी साजरी केली जाते. अतिशय वेगळ्या प्रकारे पारंपरिक पद्धतीने हा उत्सव साजरा केला जातो. गोविंदांच्या अंगात कान्होबाचे वारे आल्याने सर्वजण घुमायला सुरुवात करतात. महिला त्यांची पूजा-अर्चा करतात. मग गोविंदा आसुडाचे फटके अंगावर मारून गावात फिरतात.
-----------------------------------------
गावागावात नवचैतन्य
गोकुळाष्टमी म्हणजे फक्त दहीहंडी फोडणे इतक्या मर्यादेचा सण नाही. यानिमित्ताने ठिकठिकाणी सांस्कृतिक, समाजोपयोगी कार्यक्रम होतात. शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार केला जातो, तर कुठे विविध खेळ खेळले जातात, तर काही ठिकाणी विविध गुणदर्शन कार्यक्रम घेतले जातात. त्यामुळे गावागावात नवचैतन्य निर्माण होते.
-----------------------------------------
सण हे निसर्गाचे रक्षण करणारे, कृषी संस्कृतीशी नाते सांगणारे आहेत. सण-उत्सवांच्या उद्देशाकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. तरच सण-उत्सव साजरे करताना पर्यावरणाच्या दृष्टीनेही अधिक उपयुक्त ठरेल.
- हभप महेश महाराज, जिल्हाध्यक्ष, सत्यशोधक वारकरी संप्रदाय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.